Wednesday, August 23, 2006

दोन शब्दं
शाळेत प्रमुख पाहुण्यांना विनंती करतात, "दोन शब्दं बोला". आम्हाला वाटायचं ते खरंच दोन शब्दं बोलतील, "जाहीर आभार". पण आमचं भाग्यं तेवढं कुठं थोर! दोन शब्दं म्हणजे दोन तास हे जरा(?) ऊशीराच कळलं. आई म्हणायचि, " दोन घटका ही मुलं झोपू देत नाहीत". आजी सांगायची,"अरे, बाहेर जातांना जरा दोन घास खाऊन जावे. तेवढाच जीवाला आधार राहतो." काका ओरडायचे," कुणी दोन क्षण गप्पं बसेल का?" माणूस सिनेमात नायिका गाते, " दोन घडीचा डाव, याला जीवन ऎसे नाव". जुगारी चटावतो खेळण्याला, जरा दोन डाव होवून जावू दे. प्रवासात सोबती समजावतात, दोन स्टेशन तर जायचे आहे, द्या त्याला थोडी जागा बसायला. आता हा जो खेळ चालु आहे तो दोन ओळींमध्ये काळं करण्याचाच तर आहे!
स्वाती